चिंतामणीरावांच्या नजरेतून

संदर्भ : हे आहेत चिंतामणीराव, एक सामान्य मराठी माणूस अगदी आपल्यासारखाच. रोजच्या रोज त्यांच्या वाचनात येणाऱ्या बातम्या असतात त्या थोड्या थोडक्या कर्जाला कंटाळून एक शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या बातम्या असतात त्या एखाद्या कुटुंबाने कर्जाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली. तसं ही या बँका त्यांच्या सारख्या सामान्य माणसाला कुठे सहज कर्ज देतात आणि तुटपुंज कर्ज जरी दिलं तर त्या मोबदल्यात त्याचं संपूर्ण आयुष्यच म्हणजे घर-दार, शेतीवाडी सर्वच तारण ठेऊन घेतात.
परंतु चिंतामणीराव आज जे बँकिंग क्षेत्रात होणारे भले मोठे घोटाळे अनुभवत आहेत त्याने ते प्रचंड व्यतीत झाले आहेत. त्यांना असं वाटू लागलं आहे की, एखादया सामान्य माणसाला तुटपुंज्या कर्जासाठी नियम, तारण आणि कागद पत्रांचा ढीग या बँका मागवून घेतात. त्या बँका ह्या खऱ्या अर्थाने केवळ श्रीमंतांच्याच असतात असं त्यांचं मत झालं आहे.
सरकार बदलून ‘अच्छे दिन’ येतील या अपेक्षेने ते बसले होते, परंतु त्यांचा निव्वळ भ्रमनिरास झाला आहे. तुम्हीच बघा वर ते काय म्हणत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.