Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रात येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार | राज्य सरकारचा निर्णय
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणार तसे मृत्यू प्रमाणपत्र | केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितली नियमावली
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोरोनाशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत ‘अधिकृत कागदपत्रांसाठी’ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने असेही म्हटले आहे की, भारतीय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाने मृतांच्या नातेवाइकांना मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी पंतप्रधानांची बैठक | ऑक्सिजन पुरवठा, मुलांसाठी बेड व औषध व्यवस्थेवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने वाढवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. त्यांनी राज्यांना औषधांचा बफर स्टॉक ठेवण्यास सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट | नवीन नियमावली जाहीर
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ | भारतात 46, 164 नव्या कोरोना रुग्णांची भर, 607 रुग्णांचा मृत्यू
भारतात गेल्या 24 तासात 46, 164 नवीन कोरोना रुग्ण आढळले. 34,159 रुग्ण बरे झाले. 607 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या 3,25,58,530 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,17,88,440 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3,33,725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 436365 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 60,38,46,475 (80,40,407) जणांचे भारतात लसीकरण झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतामधील कोरोना महामारीचा अंत जवळ आला | जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांचा अंदाज
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून भारतीयांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतामधील कोरोनाच्या स्थितीवरून दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाची स्थिती महामारीवरून (पॅन्डिमिक) एन्डिमिसिटी होत असल्याचा अंदाज डॉ. स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. एन्डिमिक अवस्थेत रोग असल्यास नागरिक या रोगासोबत जगण्याचे शिकतात.
4 वर्षांपूर्वी -
Corona Second Wave | दुसरी लाट ओसरली | संसर्गाचा दर 2.44 टक्क्यांवर | तिसऱ्या लाटेसाठी सरकार सतर्क
राज्यात उद्भवलेली प्रलयंकारी कोरोनाची दुसरी लाट आता संपुष्टात आली असून अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. तसेच ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वयाच्या आतील २५ टक्के नागरिकांना कोरोनाची किमान एक लसमात्रा दिली गेल्याने राज्य सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर २.४४ टक्के इतका अल्प आहे. बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्या बैठकीत आरोग्य विभागाने राज्यातील काेरोना स्थितीचे सादरीकरण केले.
4 वर्षांपूर्वी -
Alert | गेल्या 24 तासात आढळले 35,197 नवीन प्रकरणे | एका दिवसात 10 हजारने वाढ
देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांत दिवसेंदिवस चढउतार होत आहे. मंगळवारी यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. देशात गेल्या 24 तासात 35 हजार 197 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे सोमवारी देशात 24 हजार 692 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. दरम्यान, एका दिवसात 37 हजार 136 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 440 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पालकांनो सावधान | तिसऱ्या लाटेचे संकेत | बंगळुरूमध्ये ५०० तर ओडिशात १३८ मुलांना कोरोना संसर्ग - सविस्तर वृत्त
शनिवारी देशात कोरोना संक्रमणाची 36,126 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या दरम्यान, 491 लोकांचा मृत्यू झाला, तर 37,934 संक्रमित लोकांनी या आजारावर मात केली. आतापर्यंत, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3.21 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि 4.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात डेल्टा प्लसमुळे 5 जणांनी जीव गमावला | लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात एंट्री
कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात अनलॉक 3.0 सुरू होत आहे. व्हायरसच्या ‘डेल्टा प्लस’ प्रकारामुळे आतापर्यंत राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक मुंबईचा, 2 रत्नागिरीचे, एक बीडचा आणि एक रायगडचा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे वय सुमारे 65 वर्षे आहे. यापैकी 2 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी प्रत्येकी एक डोस घेतला होता. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण 66 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
डिसेंबर'पर्यंत लसीकरण कसं पूर्ण होईल? | राजकारणी लोक थापा मारतात | सिरमच्या अध्यक्षांनी सत्य मांडलं
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
सिरमच्या अध्यक्षांचा गौप्यस्फोट | पुण्याला सर्वाधिक लस देण्यास सिरम तयार होती, पण मोदी सरकारने...
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मुंबईसह राज्यातील हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार - राज्य सरकारचा निर्णय
कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना | तर पंजाबमध्ये २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे. आज महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत या सूचना आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना | मिरवणुका काढण्यास परवानगी नाही
मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार | आज संध्याकाळी जीआर निघणार
कोरोना संसर्ग कमी असलेल्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २९) जाहीर केले होते. परंतु याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी होती. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्ग कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज जीआर काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोविड संकट कायम असल्याने पायी वारीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पायी वारीसाठी परवानगी नाकारली आहे. या बाबत वारकर्यांनी सर्वोच्च न्यायालयात पायी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हि याचिका फेटाळली आहे. गेल्यावर्षी आणि यावर्षी कोरोना असल्याने वारीला संमती देण्यात आलेली नाही. वारीला संमती मिळावी म्हणून वारकऱ्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार | कसे असणार नवे नियम?
देशभरात कोरोनाचा थैमान अद्यापही सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्यात येणार असून याबाबत टास्कफोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट? | SBI च्या अहवालामुळे चिंतेत वाढ
SBI’ने त्यांच्या अहवालात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाकीत वर्तवलं होतं. त्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात ७ मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली. या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर | सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा - वाचा सविस्तर
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी