सावंतवाडी'स्थीत हॉटेल मधील बलात्कार प्रकरणामुळे केसरकर व वैभव नाईक यांच्या विरुद्ध संताप

सावंतवाडी : कोकणातील वातावरण सध्या सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर मळगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वतः शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, ज्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला ते हॉटेल शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले आहे. त्यात भर म्हणजे ते विवादित हॉटेल मुंबईतील शिवसेना नगरसेविकेचा दीर चालवत होता असं वृत्त आहे.
त्यात अजून भर म्हणजे ३ प्रमुख आरोपींपैकी दोघे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचे कार्यकर्ते असल्याचेही समोर आले आहे. अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तीन जणांनी तिच्यावर शुक्रवारी अत्याचार केला होता. या घटनेने सावंतवाडी आणि परिसरात संतापाचे वातावरण आहे. सर्वच पक्ष सध्या शिवसेनेविरुद्ध रस्त्यावर उतरून सरकारला या प्रकरणी जाब विचारत आहेत.
ज्या व्यक्तीने हे हॉटेल चालवण्यासाठी घेतले तो मुंबईतील शिवसेनेच्या एका नगरसेविकेचा दीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. हॉटेलची रुम भाड्याने देण्यापूर्वी हॉटेल चालकाने आरोपींकडे कोणतीही ओळखपत्राची माहिती का मागितली नाही, असाही सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत. त्यात ३ पैकी २ आरोपी हे गृहराज्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या घृणास्पद प्रकरणात तपास यंत्रणा निष्पक्ष तपास करतील का, अशीही शंका विरोधक उपस्थित करत आहेत.
असे दोन नंबर धंदे करणार्यां मुळे एका मुलीची आब्रू गेली अशी टीका सर्व विरोधक करत आहेत. पीडित युवती मित्रासोबत फिरत असल्याचे पाहून कुडाळ येथील एका युवकाने तिला तुझ्या घरी तुझे नाव सांगतो असे धमकावून तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिला कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, हॉटेलच्या खाली त्याचे दोन मित्र वाट पाहत होते. हॉटेलमधून खाली आल्यावर त्याने पीडितेला त्या दोन मित्रांच्या ताब्यात दिले. त्या दोघे तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रेल्वेस्टेशनकडे घेऊन गेले. तिथे एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोघांनी पुन्हा बलात्कार केला असं वृत्त आहे. त्या पीडितेच्या संपूर्ण कुटुंब सध्या हादरून गेले आहे. दरम्यान या घटनेमुळे शिवसेनेविरुद्ध संताप पेटण्याची शक्यता आहे असं स्थानिक राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईकच्या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. हॉटेल चालवणारे शिवसेनेच्या एक मुंबई नगरसेवकांचा दीर. कागतपत्र न बगता रूम दिलीच कशी? असे दोन नंबर धंदे करणार्यां मुळे एका मुलीची आब्रू गेली. ३ पैकी २ आरोपी मळगाववातले पालकमंत्री केसरकारांचे कार्यकर्ते आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 25, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं