आधी काँग्रेस आणि आता मोदी सरकारविरोधात अण्णांचं आंदोलन

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडणार आहेत. लोकपाल तसेच कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा मोदी सरकारला इशारा दिला आहे. राज्य भाजपच्या अनेक दिग्गज नेते मंडळींनी यावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, मात्र अण्णांनी माघार घेणार नसल्याचं कळवलं आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा अण्णांनी निर्धार केल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढणार यात शंका नाही. येत्या २ ऑक्टोबरपासून अण्णा राळेगणमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत, तरी दिल्ली तसेच देशातील अन्य अनेक ठिकाणी अण्णांच्या चाहत्यांनी आंदोलनाची जोरदार तयारी चालविली आहे.
आधीच महागाईमुळे भाजपच्या विरोधात वातावरण तयार होतं आहे. त्यात अण्णांचं आंदोलन भाजपला अजून अडचणीत आणू शकत. यापूर्वीच्या सरकारनं अण्णांच्या पत्रांना उत्तर देण्याचं सौजन्य दाखविलं आहे. अण्णांच्या जंतरमंतरवरील आंदोलनामुळं सरकारला बॅकफुटवर जावं लागलं होत. लोकपालांची नियुक्ती, लोकायुक्तांची नियुक्ती, भ्रष्टाचारविरोधी कायदा आदींबाबत सरकारला काही पावलं वेळीच उचलावी लागली होती हे ध्यानात घ्यायला हवं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं