हायअलर्ट! बायोमेड कंपनीची लस महाराष्ट्र व यूपी'मध्ये वापरल्याने पोलिओचा धोका

नवी दिल्ली : भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात याच बायोमेड कंपनीची लस वापरल्याचे समोर आल्याने या दोन राज्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे पोलिओमुक्त भारतावर पुन्हा पोलिओ संकट कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पालक धास्तावले असून आपल्या मुलांना याच कंपनीची लस दिली गेली नाही ना अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बायोमेड कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्या आहेत असं स्पष्ट झालं आहे. राज्यातील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ व्हायरसचे लक्षण आढळून आल्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदवून कंपनीच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं