Amruta Fadnavis & Jaideep Rana | लवंगी फुटताच अमृता फडणवीसांच्या गाण्यातून त्या 'फायनान्सरचं' नाव हटवलं

मुंबई, 01 नोव्हेंबर | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची माळ लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य (Amruta Fadnavis and Jaideep Rana) व्यक्त केलं जात आहे.
Amruta Fadnavis and Jaideep Rana. After Malik’s allegation, Jaideep Rana’s name appears to have been dropped from the Mumbai River Anthem Song on YouTube :
जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मलिकांनी केला होता. फडणवीसांनी आरोप फेटाळताना हा लवंगी फटका असल्याचं म्हटलं होतं. पण ते लवंगी फटाक्याने एवढे का बिथरले असा देखील प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जातोय.
कारण यूट्यूबवर या गाण्याचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओखाली असलेल्या श्रेयनामावलीचा एक फोटो नवाब मलिक यांनी ट्वीटरवर ट्वीट केला ज्यात स्पष्टपणे या व्हिडिओचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे असं दिसत आहे.पण आता जर आपण यूट्यूबवर गेलात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत झालेला मुंबई रिव्हर अँथम हा व्हिडिओ पाहिला असता. या व्हिडिओच्या खाली दिलेल्या श्रेयनामावलीत जयदीप राणाचं नाव आपल्याला दिसतच नाही.त्यामुळे आता प्रश्न हा पडतो की नवाब मलिकांनी ट्वीट केलेल्या फोटोमधील जयदीप राणाचं असलेलं नाव आणि यूट्यूबवरच्या आत्ता असलेल्या व्हिडिओत जयदीप राणाचं नसलेलं नाव यातून बराच संशय निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
Details of ‘River Song’ which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Amruta Fadnavis and Jaideep Rana controversy Ranas name disappears from Amrita Fadnavis song
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं