नाहीतर भाजपचे 'रामनाम सत्य' होईल: उद्धव ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्षाने लवकरात लवकर अयोध्येतील राम मंदिर उभारावे नाहीतर हिंदू समाज त्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा थेट गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने मुखपत्रातून केला आहे.
सध्या केंद्रात,राज्यात तसेच फैजाबाद महानगरपालिकेत तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असून देखील अयोध्येत राम मंदिर का होत नाही असा थेट सवालही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. तसंच जर न्यायालयीन मार्गाने होत नसेल तर केंद्र सरकारने थेट अध्यादेश आणून राम मंदिर उभारावे असा सल्ला देखील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दिला आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करताना बाबरी पाडण्याचं काम शिवसैनिकांनी चोख बजावलं असून खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची जबाबदारी घेतली होती याची आठवण सुद्धा शिवसेनेने यावेळी भाजपला करून दिली आहे. सगळी सत्ता हातात असताना रामाचा अयोध्येतला ‘वनवास’ संपवावा अन्यथा तुमचं बरं होणार नाही, असा इशाराच शिवसेनेने या अग्रलेखातून दिला आहे.
काय म्हटलं आहे नेमकं अग्रलेखात;
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राममंदिराच्या उभारणीबाबत एक शब्दही बोलत नाहीत. ते राम मंदिर उभारणार नाहीत ,ही हिंदू जनभावना
- मोदी हिंदुत्व, राममंदिर वगैरे विषयांवर बोलत नाहीत आणि जे बोलतात त्यांना त्रास देत आहेत. खरंतर रामभक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली तेव्हा कोठे भाजप दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला.
- राममंदिराचे काय व्हायचे ते आता सर्वोच्च न्यायालयातच होईल असे सांगणे हे ढोंग आहे. सर्वोच्च न्यायालयास विचारून पंचवीस वर्षांपूर्वी ‘राममंदिराची लढाई’ आपण सुरू केली नव्हती.
- न्यायालयाने काय करायचे ते करू द्यात, पण ट्रिपल तलाक, एस.सी.-एस.टी. अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात जसे न्यायालयीन निर्णयास बाजूला ठेवून अध्यादेश काढले तसा अध्यादेश राममंदिराच्या बाबतीत काढायला काहीच हरकत नाही.
- केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत कसली अडचण?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं