गुजरातमध्ये पुन्हा एका ३ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, त्यातही उत्तर भारतीयावर कनेक्शन?

अहमदाबाद : सदर आरोपी फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसोबत १५ दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे वास्तव्यास आला होता. दरम्यान पीडित मुलीचे वडिल हे रोजंदारीवर रंगकाम करतात असं वृत्त आहे. आधीच्या प्रकरणामुळे गुजरात उत्तर भारतीयांविरोधात तापले असताना पुन्हा असा प्रकार घडल्याने गुजरात पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहेत. सध्या आरोपीची ओळख गुप्त ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
फरार आरोपीचं वय २० वर्ष असून तो मूळचा उत्तर भारतीय असल्याचं समजतं. त्याने सुरतमध्ये साडे-तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे, परंतु गुजरात पोलीस सर्व माहिती गुप्त ठेवत आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील साबरकांठा येथे एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर, गुजरातमध्ये हिंसाचार उफाळला. तर, हजारो उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलून लावण्यात आले.
पोलीस सध्या आरोपीचा कसून तपास करत असून तो पूर्ण होईपर्यंत आरोपीचे नाव गुपित ठेवले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक राजकारणी सुद्धा सतर्क झाले आहेत. भाजपा खासदार सी.आर. पाटिल यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची विशेष भेट घेतली असून त्यांना ५०,००० रुपयांची मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून ४ लाख ५० हजार रुपयांची दत सुद्धा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुढे विरोधक काय भूमिका घेतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं