उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
शिवसेनेच्या ५२व्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात संयत स्पष्ट दिसत होता. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत युती तोडण्याबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नसला, केवळ भाषणात बोलताना ‘काय ते परत परत बोलायचं’ असं म्हणत वेळ मारून घेतली. तरी आम्ही सत्तेत हिंदुत्वासाठीच आहोत, असे सांगत सामान्यांच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष सुद्धा कायम राहील, असे सुद्धा भाषणात म्हटलं.
‘अच्छे दिन’चे नारे देत सत्तेवर आलेल्या सरकारने नंतर त्या सर्व घोषणा म्हणजे ‘जुमलेबाजी’ होती, असे निर्लज्जपणे जाहीर केले. मग आता राममंदिर हासुद्धा जुमलाच होता का, अशी बोचरी टीका सुद्धा त्यांनी केली. उत्तर प्रदेश म्हणजे अयोध्येतील राममंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी मी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान केली आहे. तसेच पुढे बोलताना देशाच्या पंतप्रधानपदी बसल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत नरेंद्र मोदी एकदाही अयोध्येला का फिरकले नाहीत, असा खडा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं