मेळघाट; चिलाटी या दुर्गम भागातील मैत्री या सेवाभावी संस्थेच्या केंद्राला राज ठाकरे यांची भेट

मेळघाट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी मेळघाटातील कुपोषण आणि सार्वजनिक आरोग्य व ग्रामीण विकास या विषयांवर रचनात्मक कार्य करणाऱ्या मैत्री या सेवाभावी संस्थेच्या चिलाटी या दुर्गम भागातील केंद्राला राज ठाकरे यांनी भेट दिली. या संस्थेचं केंद्र चिखलदरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे जवळपास ४० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
राज ठाकरे जर चिलाटी सारख्या दुर्गम भागात भेटीला आले असतील तर त्यांच्यामनात नक्कीच काही तरी इथल्या लोकांसाठी असेल असं स्थानिकांना वाटत आहे. त्यामुळे जर बाहेरच्या आधुनिक जगाशी त्यांचं दुर्गम भागातील जग जोडलं जाणार असेल तर ते आम्हा ग्रामस्थांना नक्कीच आवडेल अशी आशावादी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गावातल्याच एका घरात दुपारच्या जेवणाचा आस्वाद सुद्धा घेतला.
चिलाटीपासून ४ किलोमीटरवर रुईपठार गावातील नारायण छोटे सेलूकर यांच्या घरी राज ठाकरे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दुपारचे जेवण घेतले. सेलूकर कुटुंबातील महिलांनी राज ठाकरे यांच्यासाठी मक्याची भाकर, राजगिरा पाल्याची भाजी, मसूर आमटी, कुठकी म्हणजे स्थानिक लाल भात आणि गोली या गोड्या पाण्यातील माशाचे कालवण असा उत्तम जेवणाचा बेत केला होता. त्यामुळे शहरातील हॉटेल दुनियेतील जेवणापेक्षा अस्सल गावातील जेवणाच्या आस्वाद घेतल्याने सर्वजण तृप्त सुद्धा झाले. विशेष म्हणजे राज भेटीमुळे नारायण छोटे सेलूकर यांच्या कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं