शिवस्मारक बांधकाम सुरु होण्याआधीच चौकशीच्या फेऱ्यात? विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी फडणवीसांकडे शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची लेखी मागणी केल्याचे वृत्त आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच अंधारात ठेवून संबंधित कंत्राटदार आणि शिवस्मारकाच्या सल्लागारांनी स्मारकाच्या मूळ रचनेत हवेतसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप मेटेंनी लेखी पत्रातून केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट हक्कभंग आणण्याचा इशारा मेटेंनी दिला आहे.
मेटेंनी आरोप करताना म्हटलं आहे की, शिवस्मारकाची उंची २१० मीटरवरुन २१२ मीटर करण्यात आली. दरम्यान, या निर्णयामुळे स्मारकाचा खर्च ८१ कोटींनी वाढत असल्याचं कंत्राटदाराने दाखवलं आहे. ते ८१ कोटी रुपये कोणाच्या परवानगीनं वाढवण्यात आले?, असा थेट प्रश्न मेटेंनी पत्रातून फडणवीसांना विचारला आहे.
स्मारकाचे संबंधित कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या मनमानी बदलांमुळे भविष्यातकाळात अनेक आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतील, असं मेटेंनी लेखी पत्रात नमूद केलं आहे. तसेच हे सर्व मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून सुरू असलेल्या या सर्व बदलांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं