राज ठाकरेंच्या भीतीने भाजपवर पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकार दत्तक घेण्याची वेळ? सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशिष्ठ विषयाला अनुसरून आणि अचूक संदर्भ जोडून सत्ताधाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरून हैराण करून सोडलं आहे. विशेष म्हणजे प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांवर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यात मोदी आणि अमित शहा व्यंगचित्रात नेहमीच केंद्रस्थानी असल्याने समाज माध्यमांवर चांगलाच धुरळा उडत आहे. परंतु, राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला व्यंगचित्राच्याच माध्यमातून प्रतिउत्तर देताना भाजपच्या पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकारांना विषय आणि संदर्भ याचं प्राथमिक ज्ञान नसल्याचं दिसत असून, त्यात भाजपचीच फजिती होत आहे.
कारण, भाजपचे हे कॉपीकॅट व्यंगचित्रकार केवळ राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रातील शब्द बदलून आणि त्यातल्या व्यक्तिरेखा बदलून संदर्भहीन व्यंगचित्र प्रसिद्ध करत आहेत. दरम्यान, शब्दखेळ करताना त्यांची एकूणच तारांबळ उडताना दिसत आहे. त्यामुळे शब्दखेळ करताना छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत कोणालाही त्यात जोडून काही संदर्भहीन व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात येत आहे. परंतु यातून व्यंगचित्रकारितेचाच अपमान होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परंतु, एकूणच राज ठाकरेंची व्यंगचित्र भाजपच्या भलतीच जिव्हारी लागत असावीत म्हणून पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकार दत्तक घेण्याची वेळ भाजपवर आली आहे का अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. मुख्य म्हणजे सत्ताधाऱ्यांनी समाज माध्यमांवर २०१४ पासून फोटोशॉपच्या माध्यमातून विरोधकांच्या मूळ फोटोमध्ये खोडसाळपणा करण्याची रुजवलेली कला आता व्यंगचित्रात सुद्धा रुजू होत आहे. त्यामुळे सध्या फोटोशॉपचा खोडसाळपणा जसा सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येत आहे, तसाच तो भविष्यात व्यंगचित्राच्याबाबतीत सुद्धा भाजपच्या अंगलट आल्यास आश्चर्य वाटायला नको.
काय आहे नेमकं ते संदर्भहीन कॉपीकॅट व्यंगचित्र?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं