काँग्रेस आणि एनसीपी'ची लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी आज सकाळी ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे असं वृत्त आहे.
याआधीच्या बैठकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससदरम्यान १७ जागांवर सहमती झाल्याचे वृत्त आहे. तर १४ जागांवर आघाडीसाठी इतर मित्रपक्ष तसेच काँग्रस – राष्ट्रवादी चर्चा करणार आहे, असे समजते. महत्वाचं म्हणजे काही जागांवर तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. त्यात पुणे, उस्मानाबाद, शिर्डी, नगर, औरंगाबाद, यवतमाळ या महत्वाच्या ६ जागांचा तिढा सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं