पैशाच्या जोरावर मोदी सरकार फेक सर्व्हे करत आहे: रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली : सध्या देशात मोठ्याप्रमाणावर महागाई वाढली आहे, त्यात पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली किंमत यामुळे मोदी सरकार अडचणीत आले असताना देशात वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणूक पूर्व सर्व्हे येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच थरातून सामान्य मतदार नाराज असताना देशात सर्वांना मोदीच हवे आहेत असे एकावर एक सर्वे प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
त्या मुद्यालाच अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर थेट टीका केली आहे. दरम्यान, बोलताना ते म्हणाले की, लाचार झालेल्या मोदी सरकारनं सामान्य लोकांचा विश्वास गमावला आहे. तसेच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचा दारुण पराभव होणार आहे. आता केवळ पैशाच्या जोरावर काही चुकीच्या मार्गाचा अवलंब करून मोदी सरकार निवडणुकीआधी अनेक फेक सर्व्हे करत आहे. ज्यामुळे पुन्हा सामन्यांमध्ये विश्वासार्हता कमावता येईल आणि एक वातावरण निर्मिती करता येईल. परंतु, अशा फेक सर्व्हेंतून सरकारला समर्थन मिळत नसते असं सुद्धा ते म्हणाले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून रोज एखादी संस्था निवडणूकपूर्व सर्व्हे प्रसिद्ध करत आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे सगळ्यांना मोदीच पुन्हा हवे आहेत असं दाखविण्यात येत आहे. त्यात अजून महत्वाची बाब म्हणजे महागाई वाढू दे, पेट्रोल-डिझेल दर गगनाला भिडु दे, बेरोजगारी वाढू दे आणि भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात अगदी रसातळाला जाऊ दे…तरी जनतेला मोदीच हवे असं काहीस न पटणारं चित्र रंगवण्यात येत आहे.
एकूणच देशात मोदींसमोर एकही नेता नसून इतर सर्व नेते त्यांच्यासमोर ५-६ टक्के आहेत, असे सर्व्हे मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध केले जात आहेत. विशेष म्हणजे काल न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियाने एक राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींच्या लोकप्रियतेवरील सर्वे प्रसिद्ध केला आहे. त्यात सुद्धा काही न पटणारे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. विशष म्हणजे पुढे याच कंपनीला अशी टिपणी का जोडावी लागली आहे की, “हा सर्व्हे कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित होऊन केलेला नाही आणि देशातील जनतेचा आवाज समजावा, यासाठी हा सर्व्हे करण्यात आला आहे” हे समजण्या पलीकडचं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं