‘राफेल डील’ प्रकरणी CBI ठाम राहिल्यास चित्र बदलेल

कराड : फ्रेंच बनावटीची राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी संदर्भात CBI यंत्रणा ठाम राहिल्यास देशातील चित्र नक्कीच बदलेल, असं दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री अमी कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सध्या एकूणच हालचालीवरून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, आगामी लोकसभा निवडणुकात बदल न झाल्यास भारतात हुकूमशाही अंमलात आली तर त्यात नवल वाटणार नसल्याची टीका चव्हाण यांनी भाषणादरम्यान केली.
कराड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते उपस्थितांना संबोधित करत होते. दरम्यान, राफेल लढाऊ विमान खरेदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे आणि या विमानांची आधीच्या व सध्याच्या खरेदीच्या किमतीतील तफावतच हेच खरेदी व्यवहारातील महाघोटाळा असल्याचे दर्शवते असं ते म्हणाले. या प्रकरणी स्वायत्त संस्था असलेलय CBI ने मुळाशी जाऊन सखोल चौकशी करत असताना त्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने सुरू केले असल्याचा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. परंतु, CBI चे अधिकारी ठाम राहिल्यास डिसेंबरअखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रातील सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल, असे राजकीय जाणकरांमधून बोलले जात असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठेचून मारण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. तसेच आज देशातील महिला सुरक्षित नसून, महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अशा प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्री, लोकप्रतिनिधींची नावे समोर आली आहेत अशा मंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागल्याकडे असे चव्हाण यांनी वक्तव्य केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं