ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळामुळे निधन

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवरील एक ‘बंडखोर’अभिनेत्री’ म्हणून त्या सर्वश्रुत होत्या. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात जन्म झाला होता.
कुटुंबात एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचा परिवार होता. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील एकही व्यक्ती अभिनय क्षेत्रात नव्हते. शिक्षण गिरगावातील ‘राममोहन’ शाळेत पूर्ण केले आणि सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेतच दुसऱ्याबाजूला एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत होत्या. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयात सुद्धा नोकरी केली होती. ‘आयएनटी’च्या स्पर्धेदरम्यान महाविद्यालया तर्फे सादर करण्यात आलेल्या एका नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे त्या नाट्यक्षेत्राकडे वळल्या असा त्यांचा एकूण प्रवास आहे.
नाटकांमधून काम करताना केवळ मनोरंजन न करता त्यामधून एखादा सामाजिक संदेश देण्यावर लालन सारंग यांनी अधिक भर दिला. कमला, सखाराम बाईंडर, गिधाडे, रथचक्र या नाटकांतील त्यांच्या भुमिका विशेष गाजल्या आणि त्या प्रकाश झोतात आल्या होत्या.
सारंग यांच्या गाजलेल्या कलाकृती म्हणजे आक्रोश (वनिता), आरोप (मोहिनी), उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला (सरिता), कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय), खोल खोल पाणी (चंद्राक्का), गिधाडे (माणिक), घरकुल, घरटे अमुचे छान (विमल), चमकला ध्रुवाचा तारा, जंगली कबुतर (गुल), जोडीदार (शरयू), तो मी नव्हेच, धंदेवाईक (चंदा), सखाराम बाइंडर (चंपा) अशा एक ना अनेक नाटकं त्यांनी गाजवली.
दरम्यान, लालन सारंग ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मानित, त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५) आणि २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं