नागपूर भाजप: खून प्रकरणात जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला उपाध्यक्ष पद बहाल

नागपूर : एका हत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह दिगवा उर्फ डल्लू सरदार याला भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष पद बहाल केले आहे . विशेष म्हणजे शहरभर त्याच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक झळकावले आहेत.
राज्याचं मुख्यमंत्रि आणि गृहमंत्रीपद असलेल्या फडणवीसांच्या नागपुरात हे अगदी अधिकृत पणे स्वीकारल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. २०१४ मधील निवडणुकीत सुद्धा अशा अनेक गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पावन करण्यात आले होते. दरम्यान, नरेंद्र सिंह दिगवा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये सुरज यादव या तरुणाची क्रूर हत्या केली होती. तेव्हा दिगवाच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. त्यामुळे २०१६ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने दिगवासह दहा आरोपींना हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दिगवा सध्या हायकोर्टातून तात्पुरता जामीन घेऊन बाहेर हिंडत आहे. शहर भाजपने त्याला उत्तर नागपूर मंडळचा झोपडपट्टी सेलचा उपाध्यक्ष बनविले आहे. कदाचित नागपूरकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद असल्याने त्याच्यातल्या गुन्हेगाराच्या अशा पल्लवित झाल्या असाव्यात असं चित्र आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं