नितांत अलिबाग किनारा

अलिबाग जवळच असलेला कुलाबा जलदुर्ग दक्षिणोत्तर 267 ते 927 मीटर लांब आणि पूर्वपश्चिम 109 मीटर रुंद अशा बेटावर आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. सुरूची उंच उंच झाडे, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं, गालिचा अंथरल्यासारखी मऊशार वाळू, समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारासारखा ताठ मानेने उभा असलेला कुलाबा किल्ला. हे वर्णन आहे अलिबाग बीचचं. अलिबाग बसस्थानकात उतरल्यानंतर साधारण 1 कि.मी. पश्चिमेला चार ते पाच कि.मी. लांबीचा वालुकाम समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किनारा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जात असला तरी अलीकडे हातगाडी वाल्यांची गर्दी येथील शांतता भंग करते, यात शंका नाही. अलिबागपासून नैरृत्येस सुमारे 300 मीटर अंतरावर कुलाबा किल्ला आहे.
भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात 3-5 कि.मी. नैरृत्येकडे 60 फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सांयकाळाच्या वेळेस अलिबाग समुद्र किनार्यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळतीला जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य बुडल्यानंतरही त्याच्या नयन मनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी आलेले आणि आपल्याच तंद्रीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात.
तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छीमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग समुद्र किनार्यावर सूर्यास्तात जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदयदेखील आहे. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्यावरील बंगले, मंदिरे, लांबावर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते.
अलिबागचा समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणार्या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनार्याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे लागते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं