शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी आयुक्तांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव हे केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज हे महापौर बंगला मागत आहेत, उद्या राज भवन सुद्धा मागतील. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
तसेच दादर शिवाजी पार्क येथील मुंबई महापालिकेच्या जिमखान्याचे आरक्षण उठवून तिथे महापौर निवासस्थान बांधण्याचा छुपा घाट मुंबई महापालिकेने घातला आहे. पण आम्ही या जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला बनू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी आयुक्त अजोय मेहता स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, याच भेटीत त्यांनी मुंबईतील अनाधिकुत फेरीवाल्यांचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर रेल्वेच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता स्वतः मुंबई पालिकेतील वॉर्ड अधिकारी पैसे घेऊन तेथे फेरीवाल्यांना बसवत आहेत. तसेच पुन्हा ठाण मांडलेल्या या फेरीवाल्यांना हटविले नाही तर तीव्र आंदोलन करू, असे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
वॉर्ड अधिकारी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावायला लागले आहेत आणि त्यानिमित्तानेच मी आयुक्तांची भेट घेऊन या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत असे राज ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे याच वेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन पुकारले आहे. त्यात एका फेरीवाल्यानं महापालिकेच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु, पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच हालचाल केल्याने पुढचा अनर्थ टळला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं