महागाईत भाजप-शिवसेना सरकारची भेट, मुंबईत घर खरेदी अजून महागणार

मुंबई : मुंबईकरांना घर खरेदी करणे अजून आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण भाजप-शिवसेना युती सरकारने स्टॅम्प डय़ुटीत १ टक्का वाढ केली असून तसे विधेयक विधानसभेत काल अधिकृतपणे मंजूर केले आहे. दरम्यान, अधिवेशनात मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक सुद्धा कोणतीही चर्चा न करता गोंधळातच मंजूर झाले असे वृत्त आहे.
दरम्यान, या विधेयकामुळे स्टॅम्प डय़ुटीत १ टक्का एवढी वाढ होणार आहे. शहरातील मेट्रो, मोनो, जलद बस सेवांच्या विकासासाठी ही अतिरिक्त स्टॅम्प डय़ुटी आकारली जाणार आहे असे म्हटले आहे. त्यामुळे एकूण मालमत्तेवरील स्टॅम्प डय़ुटी आता ६ टक्क्यांवरून ७ टक्के झाली आहे आहे. त्यामुळे प्रॉपर्टीच्या विक्री, दान तसेच तारण ठेवण्यासाठी देण्यात येणा-या स्टॅम्प डय़ुटीत वाढ होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांचा घर खरेदी करताना खर्च वाढणार आणि घर खरेदीची स्वप्नं अजून महाग होणार आहेत.
ग्राहकाला कोणत्याही इमारतीतील खरेदी-विक्री, भाडेतत्त्वावरील करार, बक्षीस पात्र करारनामा असो वा तारण ठेवलेली कागदपत्रे, या सर्वांसाठी स्टॅम्प डय़ुटी अनिवार्य असते. त्यामुळे एकूण स्टॅम्प डय़ुटी आता ७ टक्के आकारली जाणार आहे. दरम्यान, या निर्णयाचा अजून एक नकारात्मक परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं