राज ठाकरेंच्या 'पंचायतीतील' कट्टर मराठी बाण्यामुळे शिवसेनेची मराठी मंतांची पंचायत?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. भाषणातील मराठीचा हिंदीत अनुवाद करताना चुकीची माहिती हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रसारित केली जाते, त्यामुळे त्यांनी हा संवाद देशभर समजावा म्हणून हिंदीत भाषण केले.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मतांकडे डोळा ठेवून हे राजकारण करत आहेत का? आणि त्यांची मराठी बद्दलची भूमिका बदलली का? असे एक ना अनेक प्रश्न प्रसार माध्यमांवर चर्चेला आले होते. परंतु, एकूण संवादानंतर संपूर्ण चित्र पालटल्याचे दिसत आहे. कारण यावेळी राज ठाकरे यांनी मराठीची कडवट भूमिका मांडल्याने, ते होते त्यापेक्षाही कडवट मराठी असल्याचे सिद्ध झाले आहे.
मराठीच्या भूमिकेवरून घुमजाव तर सोडा उलट त्यांनी उत्तर भारतीयांनाच इथल्या संस्कृतीप्रमाणे बदलण्याचा सल्ला दिला. उत्तर भारताच्या पूर्ण इतिहासच त्यांनी येथे मांडला आणि कायदा काय सांगतो हे सुद्धा उदाहरणं देऊन स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र आणि इथल्या राजकारण्यांना दोष देण्यापेक्षा तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील राजकारण्यांना प्रश्न विचारा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
दरम्यान, बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे केवळ इथल्या मूळ मराठी लोकांनाच नाही तर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या अमराठी लोकांना सुद्धा त्रास होत आहे, असं त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींवर सर्वप्रथम मराठी युवक-युवतींचाच अधिकार आहे आणि जर तो मिळणार नसेल तर संघर्ष तर अटळ आहे असे ते म्हणाले. मी येथे स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे तर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे आणि मी माझ्या पूर्वीच्या भूमिकांवर आजही ठाम आहे, असं त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले. त्यांनी हिंदीत संवाद साधल्याने हिंदी प्रसार माध्यमं तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे.
परंतु, मागील अनेक महिन्यांपासून मुंबई-ठाण्यात ‘उत्तर भारतीय संमेलनं’ आयोजित करत आला आहे. परंतु, उत्तर भारतीय मतपेटीच्या आहारी गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्या मंचावर थेट “उत्तर भारतीयो के सन्मान में शिवसेना मैदाना में” अशा घोषणा जाहीर घोषणा देत थेट भोजपुरी भाषेत संवाद साधला होता. त्यामुळे शिवसेनेची मराठीची भूमिका ही केवळ दिखाऊ असल्याचं समोर येत आहे. उत्तर भारतीयांच्या प्रमुख शहरातील वाढत्या आकडेवारी पुढे शिवसेनेने मतांसाठी अक्षरशः लोटांगण घातल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची मराठी प्रतीची भूमिका या वेगवेगळ्या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे.
काय आहेत ते ‘उत्तर भारतीय संमेलनातले’ शिवसेनेचे संवाद?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं