धुळे: भाजपला ५० जागांसह स्पष्ट बहुमत मिळणार, तर अनिल गोटे तोंडघशी

धुळे: महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर सत्तास्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत असून त्यांनी एकहाती सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. धुळ्यात भारतीय जनता पक्षाचे जवळपास ५० हून अधिक उमेदवार आघाडीवर होते.
त्यामुळे भाजप हा धुळे महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी अनेक मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
तसेच आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेचे भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न असफल झाल्याचं चित्र आहे. धुळे महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील एकूण ७३ जागांसाठी हे मतदान पार पडले होते. दरम्यान, एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण ७४ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी एकूण २० जागा राखीव होत्या अशी आकडेवारी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं