शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी, मतदाराच्या या वृत्तीमुळेच राजकारणी उन्मत्त होतात?

नगर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमवर सर्वबाजूने टीका झाली होती. परंतु, असं असताना अहमदनगरच्या जनतेने मात्र त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम तडीपार असताना सुद्धा वॉर्ड क्रमांक ९ मधून तब्बल २००० पेक्षा अधिक मताधिक्याने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा त्याच्या भावाने मतदान केंद्रावर जाऊन थेट EVM मशीनची पूजा केली होती आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा होती. परंतु आजच्या निकालाने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. एकाबाजूला त्याला मतदार धडा शिकवणार असं म्हटलं जात असताना तो अधिक मताधिक्याने निवडून आला आहे.
दरम्यान. तो जरी अपक्ष म्हणून निवडून आला असला तरी सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं