राहुल गांधींच्या प्रचंड मेहनतीमुळे काँग्रेसला यश मिळाले : सोनिया गांधी

नवी दिल्ली : आज राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर एक वर्ष पूर्ण होतं आहे. दरम्यान, आजच्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या निकालावरून सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची स्तुती करताना म्हटलं की, पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळेच आजचं यश मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधी आज जरी काँग्रेसच्या अध्यक्ष नसल्या तरी आजही त्या यूपीएच्या प्रमुख आहेत आणि त्यामुळे या सर्व निकालांवर त्यांचे सुद्धा बारीक लक्ष आहे. आता पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये छत्तीसगढमध्ये काँग्रेसला ९० पैकी ५४ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मध्यप्रदेशात २३० जागांपैकी १११ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर राजस्थानातील १९९ जागांपैकी १०४ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. दरम्यान, हे सगळं यश राहुल गांधींच्या प्रचंड मेहनतीमुळे पक्षाला मिळालं आहे असं त्या म्हणाल्या.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हे मोदी, अमित शहा आणि एकूणच भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक आहेत. अजून तरी संपूर्ण निकाल यायचे बाकी असले तरी ३ प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसने बाजी मारलेली आहे असे एकूण चित्र आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं