बुलेट ट्रेन संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक नाही: आरटीआय

नवी दिल्ली : मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील व्यवहार्यता न समजून घेताच महाराष्ट्र सरकारने मजुरी दिली असल्याचे सत्य माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. तसेच बुलेट ट्रेन संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक पार पडली नसल्याचे सत्य माहितीच्या अधिकृत उघड झालं आहे. विशेष म्हणजे जर संबंधित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची अद्याप एकही बैठक पार पडलीच नाही तर या प्रकल्पाला आंधळेपणाने मजुरी कोणी दिली असं प्रश्न आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित प्रककल्पाचा आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, या उपसमितीत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि दिवाकर रावते यांचाही समावेश आहे. त्यामध्ये परिवहन विभागाच्या महत्वाच्या सूचना असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत या प्रकल्पाला मजुरी देण्यात आली होती.
कोट्यवधींचा एफएसआय बुडीत असून सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर नफा आणि तोट्यात भागीदारी, तसेच भविष्यात तोटा झाल्यास त्याचा आर्थिक भार सोसण्याची जवाबदारी आणि इतर देशांमधील बुलेट ट्रेनच्या अर्थकारण आणि तांत्रिक बाबींचा अभ्याक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे उघड होतं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं