नाशिक भाजप मधलं अंतर्गत राजकारण तापलं.

नाशिक : शहरातील प्रस्तावित महिला रुग्णालयाच्या वादातून नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते आणि आमदार देवयानी फरांदे यांच्यातील वाद पेटल्याचे वृत्त आहे. नाशिक शहरात १०० खाटांचे महिला रुग्णालय प्रस्तावित असून त्यासाठी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी हट्ट धरला आहे.
परंतु फरांदे यांच्या या प्रस्तावाला नाशिकचे माजी आमदार वसंत गीते, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते, गीते समर्थक नगरसेवक सुमन भालेराव आणि अर्चना थोरात यांनी तीव्र आणि उघड विरोध केला. आमदार देवयानी फरांदे यांचा हा प्रस्ताव होऊन पाडण्यात आला, परंतु खवळलेल्या आमदार फरांदे यांनी जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले.
अखेर नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून ते महिला रुग्णालय भाभानगरच्याच जागेवर उभारावे असे आदेश दिले. त्यानुसार ठराव ही मंजूर करण्यात आला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वसंत गीते आणि प्रथमेश गीते यांनी त्याला विरोध कायमच ठेवला आहे. परंतु महिला रुग्णालयाचा अजून थांग पत्ता नसतानाच नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते यांनी त्याच जागेवर ‘ग्रीनजिम’ उभी करण्याचा ठरवले असून त्यासाठी जागेची साफसफाई सुध्दा सुरु केली आहे.
शहरातील भाजप अंतर्गत गटबाजी वाढल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढे आमदार देवयानी फरांदे आणि प्रथमेश गीते यांच्यातील हा वाद काही दिवसात अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं