आगामी लोकसभा: यूपीतल्या ८० जागांसाठी भाजप, संघ आणि विहिंपची एकत्र रणनीती?

बंगळुरू : यूपीतल्या लोकसभेच्या तब्बल ८० जागांसाठी भाजप, संघ आणि विहिंप एकत्र येऊन विशेष रणनीती खाण्याची तयारी करत आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएचे तब्बल ७१ खासदार निवडून आल्याने मोदींचा मार्ग सुकर झाला होता.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा यश प्राप्त करायचे असेल उत्तर प्रदेशवर ताबा मिळवणं महत्वाचं आहे. त्यामुळेच भाजपा, संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषद पुन्हा एकदा एकत्र रणनिती आखणार आहेत असं वृत्त आहे. दरम्यान, मागील ३ महिन्यांपासून भाजपा आणि संघ परिवार लोकसभेच्या सर्व जागांची प्रत्यक्ष जमिनीवरील चाचपणी करत आहे. भाजपाच्या योजनेंतर्गत लोकसभेच्या भागातील नेते आणि कार्यकर्त्यांना लोकांमध्ये कुठल्या मुद्द्यांची जास्त चर्चा आहे, याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.
त्यासाठी ग्राऊंड झिरोचा संपूर्ण अहवाल एकत्र करून रणनीती आखण्याची भाजपाची विशेष योजना आहे. त्यासाठी गुजरातचे माजी गृहमंत्री गोरधन झडफिया हे नियुक्त रणनीतीचा एक प्रमुख असतील. त्यासाठी प्रथम भाजपाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येण्याचा आदेशही दिला आहे. विशेष म्हणजे केवळ स्वतःचेच म्हणणे नेत्यांवर लादणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून सुद्धा० पक्षातील असंतुष्ट नेत्यांना समजावण्याचा प्रयत्नही होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं