VIDEO सावधान! भाजपकडून 'चुनावी जुमलेबाज' जाहिरातींचा पुन्हा सुळसुळाट होणार? सविस्तर

नवी दिल्ली : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत सामान्यांना आकर्षित करणाऱ्या भाजपच्या अनेक जाहिरातींनी मतदाराला भुरळ पाडली होती. मात्र सरकार आल्यावर त्या सर्व चुनावी जुमला असल्याचं भाजपच्या नेत्यांनी मान्य केले होते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांना काही महिने उरले असताना, त्याप्रकारच्या जाहिराती भाजप पुन्हा शब्दांचे खेळ करत लोकांच्या माथी करण्याची तयारी करत आहे असं समोर येतं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलेली जाहिरात अनेक हास्यास्पद दावे करून लोकांकडून पैसे दान करण्याचे आवाहन करत आहे.
२०१४ मध्ये ‘अब कि बार मोदी सरकार’ ही घोषणा आणि जाहिरात आता ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आता अँपच्या माध्यमातून डोनेशन मागत आहे. दुसरं म्हणजे डोनेशनच्या कमीत कमी ५ रुपयांचा शब्दखेळ करून ५ रुपयात रस्ते, विमानतळ, उड्डाणपूल, वीज आणि सिलेंडर असे हास्यास्पद दावे केले आहेत. सर्वांनी भाजपाला डोनेशन द्या, म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा पंतप्रधान होतील आणि मग पुन्हा पंतप्रधान झाल्यावर ते अजून रस्ते, विमानतळ, उड्डाणपूल बांधतील. वास्तविक मोदींनी सत्ताकाळात उदघाटन केलेले रस्ते, विमानतळ आणि उड्डाणपूल हे काँग्रेसच्या काळात मार्गी लागले होते, ज्यांचा बांधकामाचा कालावधी हा ४-५ वर्ष असा होता. परंतु भाजपाची सत्ता आल्यावर पूर्ण झाले आणि मोदींनी स्वतःची जाहिरात करून घेतली हे वास्तव आहे.
त्यामुळे लवकरच जुमलेबाज जाहिराती पुन्हा सुळसुळाट करणार अशी शक्यता अमित शहा यांच्या या ट्विटवरून प्रथम दर्शनी लक्षात येते आहे. विरोधकांनी वेळीच पुढे येऊन या जाहिरातींमागील बिंग फोडलं नाही तर पुन्हा वर्तमानपत्र, टेलिव्हिजन आणि समाज माध्यमांच्या मार्फत लोकांना पुन्हा मूर्ख बनवण्याचे प्रयत्न जोरात सुरु होतील अशी शक्यता आहे.
VIDEO: काय ट्विट केलं आहे अमित शहा यांनी?
Your small donations can make a BIG difference. Donate any amount between Rs 5 and 1000 using NM App and do your bit in realising PM @narendramodi‘s dream of a #NewIndia.
You can also donate using: https://t.co/VILyxBFfdE#PhirEkBaarModiSarkar pic.twitter.com/55vW716MBO
— Amit Shah (@AmitShah) December 26, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं