भारताच्या इतिहासातील सर्वात महागडे पंतप्रधान, ९२ देश आणि खर्च २०२१ कोटी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका नवा इतिहास घडवला आहे. कारण मागील ४.५ वर्षांत मोदींनी एकूण ९२ देशांचा दौरा केला. त्या ९२ देशांच्या दौऱ्यावर सरकारचे तब्बल २०२१ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. त्यापैकी १४ देशांचे दौरे त्यांनी केवळ २०१८ मध्येच केले आहेत.
दरम्यान, मोदींचे विदेश दौरे आणि त्यावरील प्रचंड मोठा खर्च हा नेहमीच प्रसार माध्यमांच्या चर्चेचा आणि राजकीय विरोधकांच्या टीकेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी यापुढे मोदींच्या कुठल्याही परदेश दौऱ्याचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागील ५५ महिन्यांत नरेंद्र मोदींनी केलेल परदेश दौरे आणि त्यावर झालेला एकूण खर्च समोर आला आहे.
पंतप्रधानांच्या ५५ महिन्यांमधील विदेश दौऱ्यावर तब्बल २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रसिद्ध आकडेवारीनुसार मोदींच्या ९२ दौऱ्यांच्या खर्चाची सरासरी काढल्यास एका दौऱ्यासाठी अंदाजे २२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याआधी युपीएचे काळातील पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ५ वर्षांच्या विदेश दौऱ्यावर भारत सरकारने १३५० कोटी रुपये खर्च केला होता. त्यामध्ये डॉ. सिंग यांनी एकूण ५० देशांचा दौरा केला होता.
मोदींच्या विदेश दौऱ्यावर सर्वाधिक खर्च हा फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दरम्यान आला. दरम्यान, काँग्रेस प्रणित युपीएचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सर्वात महागडी विदेश यात्रा २०१२ मध्ये ठरली होती आणि त्यादौऱ्यासाठी भारत सरकारला २६.९४ कोटी रुपये खर्च आला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं