वेळ, खर्च, दौऱ्यांचा आकडा व आलेली गुंतवणूक बघा, मोदी नाही! मनमोहन सिंग उजवे: सविस्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन आणि त्यावर झालेल्या खर्चांवरुन सोशल मीडियावतून मोदींवर टीका करण्यात येते. मात्र, मोदींचे एकूण विदेश दौरे, वेळ, त्यासाठी आलेला खर्च आणि त्यामुळे देशात आलेली परकीय गुंतवणूक पाहता आणि त्याची तुलना डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत करता मनमोहन सिंग हेच उजवे ठरतील अशी आकडेवारी खुद्द राज्यसभेत खासदार वीके. सिंह यांच्या उत्तरातून समोर आली आहे.
नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यातील खर्चावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला खासदार जनरल वि.के. सिंह यांनी राज्यसभेत सर्व माहिती दिली. त्यावेळी, नरेंद्र मोदींनी ज्या देशांना भेटी दिल्या, त्या देशांतून भारतात झालेल्या गुंतवणुकीचा आकडा स्पष्ट झाला आहे. म्हणजे यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २०११ ते २०१४ या कालावधीत अमेरिकेने भारतात एकूण ८१ हजार ८४३.२१ मिलियन्स डॉलरची गुंतवणूक केली होती. तर, मोदी सरकारच्या २०१४ ते २०१८ या कालावधीत ही गुंतवणूक वाढून १ लाख ३६ हजार ७७.७५ मिलियन्स डॉलर एवढी वाढली आहे.
देशात २०१७ पर्यंत झालेल्या एकूण परदेशी गुंतवणुकीचा विचार केल्यास किंवा एफडीआयची आकडेवारी पाहिल्यास एकूण गुंतवणूक ४३ हजार ४७८.२७ मिलियन्स अमेरिकी डॉलर एवढी आहे. तर तीच परकीय गुंतवणूक २०१४ साली ३० हजार ९३०.५ मिलियन्स डॉलर एवढी होती. परंतु, मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या तुलनेत दुप्पट परदेश दौरे, वेळ आणि त्या परदेश दौऱ्यांवर केलेला एकूण खर्च पाहता डॉ. मनमोहन सिंग हेच उजवे ठरले आहेत असे म्हणावे लागेल.
कारण मागील ४.५ वर्षांत मोदींनी एकूण ९२ देशांचा दौरा केला. त्या ९२ देशांच्या दौऱ्यावर सरकारचे तब्बल २०२१ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. त्यापैकी १४ देशांचे दौरे त्यांनी केवळ २०१८ मध्येच केले आहेत.
त्याआधी युपीएचे काळातील पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ५ वर्षांच्या विदेश दौऱ्यावर भारत सरकारने १३५० कोटी रुपये खर्च केला होता. त्यामध्ये डॉ. सिंग यांनी एकूण ५० देशांचा दौरा केला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं