मतदारांनो! आली रे आली निवडणुकीपूर्व 'मोदी' स्वस्ताई आली! सविस्तर

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि विशेष करून मोदी ब्रॅण्डला पडलेल्या फटाक्यांमुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीआधी खडबडून जाग आली आहे. महागाई घटत नसल्याने भाजपची मतं घटली आणि परिणामी धार्मिक राजकारण पथ्यावर न पडल्याने हिंदी भाषिक पट्यात काँग्रेस सत्तेत विराजमान झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीचा धसका घेतलेल्या मोदी सरकारकडून निवडणुकीआधी मतदारांना आकर्षित करण्यासाठी करांमध्ये घट करून विविध वस्तू स्वस्त करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व करण्यासाठी मागील साडेचार वर्ष मोदी सरकारला कोणी रोखले होते असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण, आजपासून सिनेमा तिकीट, मानिटर स्क्रीन, पावर बँक आणि ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. २२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जीएसटी परिषदने २३ वस्तूवरील कर कमी केला होता. आजपासून ही आमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात सर्वसामान्य व्यक्तींना गिफ्ट मिळाले असले तरी २-३ महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक त्यामागील मूळ कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटतं.
इतकेच नाही तर डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहे. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.
तसेच हवाबंद डब्यात गोठवून ठेवलेल्या ब्रॅण्डेड भाज्या आणि संरक्षित केलेल्या भाज्यांवरील ५ टक्के जीएसटी रद्द, तर अपंगांच्या व्हिलचेअरसह सर्व वस्तू आणि त्यांचे सुटे भाग यांच्यावर जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर संगमरवर दगडावरील १८ टक्के जीएसटी ५ टक्क्यांवर, चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर, संगीतावरील पुस्तकांचा कर १२ वरून शून्यावर आला आहे.
मागील साडेचार वर्ष यासर्व बाबींचं विचार सुद्धा न करणारं मोदी सरकार लोकसभा निवडणुकीआधी एवढं दिलदार होण्यामागील मूळ कारण हे पाच राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बसलेला फटका आणि आगामी लोकसभा निवडणूक असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं