VIDEO: राफेल प्रश्नांवरून राहुल गांधीनी घाम काढताच भाजपची पाकिस्तान-पाकिस्तान बोंब सुरु? सविस्तर

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या गंभीर आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी मूळ प्रश्न आणि त्याला अनुसरून उत्तर देण्याऐवजी चर्चा भलत्याच विषयावर केंद्रित केली असे म्हणावे लागेल. विषय लोकसभेत चर्चेला असताना निर्मला सीतारमन यांनी पुन्हा मोदींच्या पराभवासाठी पाकिस्तानची मदत घ्यायला काँग्रेसला लाज नाही का वाटत ? असा काहीही संबंध नसणार विधान केलं आहे.
याआधी जेव्हा काँग्रेसच्या काळात बोफोर्सचा मुद्दा लोकसभेत तापला होता, तेव्हा याच भाजपने सर्व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. बोफोर्सचा दर्जा आणि त्यासंबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यावेळी भाजपाला संरक्षण विभागातील गोपनीयता महत्वाची वाटली नव्हती. परंतु, आज सत्तेत असलेली तीच भाजप गोपनीयतेच्या मुद्यावरून राफेल संबंधित विषयावरून आणि विरोधकांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान-पाकिस्तान अशी बोंब सुरु करत आहे.
इतकंच नव्हे तर राफेल विमानांबद्दलची माहिती आणि प्रश्न उपस्थित करताच त्यावर थेट काँग्रेसचे वरिष्ठ खासदार हवाईदल प्रमुखांना खोटारडे म्हणतात आणि नव्या लढाऊ विमानांमध्ये बसवण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल सविस्तर माहिती मागितली जाते. हे सर्व गोपनीय कायद्यातंर्गत येते. विमानांची बेस किंमत आधीच सर्वांसमोर आली आहे अशी बोंब संरक्षण मंत्री सीतारमनयांनी लोकसभेत केली.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयाचे काम दलालीशिवाय चालते. बोफोर्स एक घोटाळा होता. राफेल हा राष्ट्रीय हित डोळयासमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन शुक्रवारी लोकसभेत राफेलवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाल्या. बोफोर्समुळे काँग्रेसची अधोगती झाली. पण राफेलमुळे भ्रष्टाचारमुक्त आणि नवीन भारत घडवण्यासाठी मोदी पुन्हा सत्तेत येतील असे सीतारमन म्हणाल्या.
वास्तविक ज्या बोफोर्स तोफांसंबंधित भाजपने प्रश्न उपस्थित करून रान उठवले होते. त्याच बोफोर्स तोफांनी वाजपेयींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात घडलेल्या कारगिल युद्धात महत्वाची भूमिका पार पडली होती. पाकिस्तानविरुद्ध दोन महायुद्ध ज्या काँग्रेसच्या काळात लढली गेली आणि जिंकली सुद्धा त्यांनी कधीच लष्कराचा पक्षाच्या प्रचारासाठी किंवा निवडणुकांसाठी वापर केला नाही. भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेल्या तत्कालीन अत्याधुनिक हत्यारांच्या जोरावर भारताने ती युद्ध जिंकली होती. परंतु, मोदी सरकार असे भासवत आहेत कि जणू लष्कराला मिळणार राफेल हे पहिलं आधुनिक लढाऊ विमान आहे आणि याआधी भारताकडे कधी आधुनिक शस्त्र नव्हतीच. वास्तविक संरक्षणविषयक आधुनिक हत्यारांच अपग्रेडेशन हे चिरंतर सुरु असतं आणि काळानरूप ते बदलत असतात हे वास्तव आहे.
परंतु, देशात सध्या भारतीय लष्कर आणि सर्जिकल स्ट्राईक असे भावनिक विषय जणूकाही निवडणुकांचे भावनिक विषय झाले असून भाजपने त्याबाबतीत कळस गाठला आहे असंच म्हणावं लागेल.
आता हे दोन व्हिडिओ बघा ज्यातील एक आहे राफेल संबंधित आणि दुसरा आहे बोफार्स संबंधित. त्यातील बोफोर्ससंबंधित विषयावर भाजपचे नेते तेव्हा संरक्षणविषयक बोफोर्स तोफांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करताना. यावरूनच समजा यांची दुपट्टी भूमिका.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं