भाजपच्या उपमहापौरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.

अहमदनगर : भाजपच्या उपमहापौरांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं असून, त्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.
श्रीपाद छिंदम यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरत असून, त्या क्लिपमुळे अहमदनगर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. श्रीपाद छिंदम हे भाजपचे अहमदनगरचे उपमहापौर आहेत.
या ऑडिओ क्लिप मध्ये श्रीपाद छिंदम हे बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्या बरोबर संभाषण करत आहेत, त्या संभाषणादरम्यान श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल चुकीचे अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे.
अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नैतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तर शिवसेनेकडून श्रीपाद छिंदम यांचा पुतळा जाळण्यात आला. या ऑडिओ क्लिप मुले अहमदनगर मध्ये तणावाचे वातावरण आहे.
|| निषेध…निषेध ||
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल @BJP4Maharashtra चे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अपशब्द वापरून तमाम जनतेच्या भावना
दुखावल्या आहेत.
याचा निषेध करण्यासाठी नागरिकांसमवेत @NCPspeaks चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा !#ahmednagar pic.twitter.com/sDNDJ7Elvk— MLA Sangram Jagtap (@sangrambhaiya) February 16, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं