बिईंग ह्युमन संस्थेला मुंबई पालिकेकडून नोटीस.

मुंबई : मुंबई पालिकेकडून सलमान खान ची संस्था ‘बिईंग ह्युमन’ ला नोटीस बजावण्यात आली आहे. सलमानच्या या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची महापालिकेची तयारी असल्याचे समजते.
‘बिईंग ह्युमन’ संस्थेला वांद्रे येथे प्रकल्प मंजूर होऊन सुद्धा सवलतीच्या दरातील डायलिसिस युनिट अजून न बसविण्यात आल्याने मुंबई महापालिकेने ही नोटीस पाठवल्याचे समजते.
प्रत्येक महिन्याला १०,००० डायलिसिस प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबई महापालिकेने डिसेंबर २०१६ मध्ये बारा डायलिसिस सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. तो प्रत्यक्षात न उतरल्याने महापालिकेने ‘बिईंग ह्युमन’ ला अखेर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
‘बिईंग ह्युमन’ संस्था आणि मुंबई महापालिकेत झालेल्या करारानुसार ‘बिईंग ह्युमन’ संस्था या सेंटर साठी कर्मचारी वर्ग आणि सेंटर साठी लागणाऱ्या सोयीसुविधा पुरवणार होती तर महानगरपालिका या सेंटरसाठी जागा पुरविणार होती.
परंतु अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची संस्था ‘बिईंग ह्युमन’ ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं