सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही: वैशाली येडे

यवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज यवतमाळ येथे सुरुवात झाली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या अर्धांगिनी असलेल्या वैशाली येडे यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आज त्यांनी उपस्थितांशी आणि समस्त महाराष्ट्राशी भावनिक संवाद साधला आणि व्यवस्थेचे वास्तव प्रत्येकासमोर ठेवले असेच म्हणावे लागेल.
दरम्यान त्यांची भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ‘अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, तर गल्लीची बाय कामी येते, माझा या जन्मावर विश्वास आहे आणि त्यामुळे मी रडत नाही तर अडचणींशी लढते आहे, पुढच्या जन्मी अदानी किंवा अंबानी होईन असे वाटून माझ्या पतीने आत्महत्या केली खरी, पण मी स्वतः हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा आत्मविश्वास आहे’ असे सुद्धा त्यांनी आवर्जून मत व्यक्त केले आणि स्वतःच्या भावना व्यक्त केल्या तसेच उपस्थितांची मतं नेमली.
तसेच पुढे त्या असं ही म्हणाल्या की, ‘आम्ही विधवा नव्हे तर एक महिला आहोत. माझा नवरा कमकुवत होता तो गेला पण मी लढणार आहे. सध्या समाजात शेतकरी आणि लेखकाला अजिबात भाव नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं