Gold Price Today | लग्नसराईचा मोसम असूनही सोने, चांदीचे दर घसरले | नवे दर पहा

Gold Price Today | जागतिक बाजारात तेजीचा ट्रेंड असला तरी भारतीय बाजारात आज सोने-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा मोसम असूनही सोन्याची मागणी कमी होत आहे, त्यामुळे वायदे भाव ५० हजारांच्या जवळ आले आहेत. मंगळवारी सकाळी चांदीचीही जवळपास ६० हजारांच्या आसपास विक्री होत होती.
२४ कॅरेट सोन्याचे दर घसरले :
मल्टीमोडिटिव्ह एक्सचेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी सकाळी २४ कॅरेट शुद्धतेचे सोन्याचे वायदे १६१ रुपयांनी घसरून ५०,५०३ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. यापूर्वी सोने 50,537 वर उघडले आणि व्यापार सुरू झाला. मात्र, मागणी घटल्याने लवकरच भाव आणखी खाली गेले. सोन्याचा भाव आज मागील ट्रेडिंग डे बंद होण्याच्या तुलनेत ०.३२ टक्क्यांनी कमी झाला आहे.
चांदीच्या दरातही आज घसरण :
चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. सकाळी एमसीएक्सवर चांदीचा वायदा 126 रुपयांनी कमी होऊन 60,185 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होता. यापूर्वी चांदीचा व्यापार 60,280 रुपयांवर खुला झाला होता. मात्र, याची मागणीही आज सुस्त राहिली आणि लवकरच आधीच्या बंदच्या तुलनेत हा दर ०.२१ टक्क्यांनी कमी झाला. या महिन्याच्या सुरुवातीला चांदीची 62 हजारांच्या जवळपास विक्री होत होती.
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी :
जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकी सराफा बाजारात सोन्याचा भाव ०.४२ टक्क्यांनी वधारून १,८२८.१७ डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीही आधीच्या बंदच्या तुलनेत ०.८४ टक्क्यांनी वधारून २१.३ डॉलर प्रति औंस झाली. जागतिक बाजारात यंदा चांदीचा कमाल भाव 27 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पोहोचला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today as on 14 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं