ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्झिट’ अमान्य; थेरेसा मे यांना जोरदार धक्का

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ‘ब्रेक्झिट’ करार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी जोरदारपणे फेटाळून लावला आहे. काल ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान पार पडले. या मतदानाच्या प्रक्रियेत एकूण ४२३ मते ही कराराच्या विरोधात पडली तर २०२ मते ही कराराच्या बाजूने झुकली आणि इथेच थेरेसा मे यांना जोरदार धक्का बसल्याचे दिसून आले.
सुमारे अडीच वर्षांपूर्वी ब्रिटनच्या लोकांनी युरोपियन युनियन सोडण्याचा कल निर्देशित केला होता. त्यानुसार २९ मार्च २०१९ रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडणार, असे जवळपास निश्चित झाले होते. परंतु, त्याआधीच ब्रिटनमध्ये मोठी धक्कादायक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली होती. ब्रिटनने ‘लिस्बन’ कराराचे पन्नास वे कलम लागू करून ‘ब्रेक्झिट’च्या औपचारिक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केली. दरम्यान, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी चांगले आणि सलोख्याचे संबंध टिकून असावे, यासाठी हा करार केला जात आहे.
दरम्यान, ब्रुसेल्स परिषदेत युरोपियन युनियन नेत्यांनी ब्रेक्झिटला तत्वतः संमती दिली. युरोपियन युनियनच्या अधिकृत मान्यतेनंतर आता या कराराला ब्रिटनच्या संसदेची मंजुरी मिळणं कायद्याने गरजेचे आहे. मात्र, ब्रिटनमधील अनेक विद्यमान खासदारांनी या कराराला कडाडून आणि तीव्र विरोध दर्शवल्याने ब्रेक्झिटचा प्रश्न आणखी किचकट होताना निदर्शनास येतो आहे. परिणामी काल झालेल्या मतदानात तर हा करार पूर्णपणे फेटाळून लावण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं