Shivsena Hijacked | शिंदेचा प्रस्ताव म्हणजे शिवसेना प्रमुखांना 'नामधारी पक्षप्रमुख' करून पक्ष स्वतःकडे घेण्याची योजना? | अजब मागण्या

Shivsena Hijacked | शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे भाजपामध्ये जाणार का? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सर्व चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अटी ठेवल्यात याची महत्त्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
काय आहेत अटी :
१. एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत. पण भाजप सोबत युती करून फडणवीसांना मुख्यमंत्री आणि मला उपमुख्यमंत्री करा.
२. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे.
३. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत.
४. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
शिवसेनेतील आजवरचे सर्वात मोठं बंड :
शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Eknath Shinde political stand against Uddhav Thackeray check details here 21 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं