Multibagger Stocks | हा शेअर खरेदी केला आहे? 5 दिवसात 80 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार

Multibagger Stocks | चर्मोद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 दिवसांत 80 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ही कंपनी आहे AKI India. गेल्या पाच दिवसांत कंपनीचे शेअर 31 रुपयांवरून 56 रुपयांवर पोहोचले आहेत. एकेआय इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही भेट देणार आहे. कंपनी 3:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 10 शेअर्स असतील त्यांना बोनस म्हणून AKI इंडियाचे 3 शेअर्स मिळतील. कंपनीने बोनस शेअरची एक्स डेट 19 जुलै 2022 रोजी निश्चित केली आहे.
5 दिवसात गुंतवणुकीचे पैसे दुप्पट :
१४ जुलै २०२२ रोजी एकेआय इंडियाचे शेअर्स ३१ रुपयांवरून ५६.१० रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी 5 दिवसात 80.97% रिटर्न दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 5 दिवसांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये ठेवले असते तर सध्या हे पैसे 1.80 लाख रुपये झाले असते. ‘एकेआय इंडिया’च्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी १२.१० रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सनी यंदा आतापर्यंत गुंतवणूकदारांना ११५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
१ वर्षात 363 टक्के रिटर्न :
गेल्या वर्षभरात ‘एकेआय इंडिया’च्या समभागांनी गुंतवणूकदारांना ३६३ टक्के परतावा दिला आहे. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) कंपनीचे शेअर्स २७ जुलै २०२१ रोजी १२.१० रुपयांच्या पातळीवर होते. 14 जुलै 2022 रोजी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 56.10 रुपयांवर बंद झाले. जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये ठेवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या हे पैसे 4.63 लाख रुपये झाले असते. एकेआय इंडियाचे मार्केट कॅप ५७.७ कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Multibagger Stocks AKI India Share Price in focus check details 15 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं