IRCTC Tour Packages | निसर्गरम्य नेपाळ मध्ये स्वस्त पॅकेजमध्ये फिरा, आयआरसीटीसी देत आहे मोठी संधी

IRCTC Tour Package | ऑगस्ट महिन्यात हिमालयाच्या कुशीत नेपाळला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून येत आहे. खरं तर, भारतीय रेल्वेचा उपक्रम आयआरसीटीसी भोपाळ ते नेपाळ या धार्मिक प्रवासासाठी एक अतिशय आलिशान आणि स्वस्त टूर पॅकेज देत आहे. या पॅकेजला ‘Naturally Nepal Ex Bhopal’ असे नाव देण्यात आले आहे. या एअर टूर पॅकेजमध्ये तुम्हाला काठमांडू आणि पोखरा येथे जाण्याची संधी मिळणार आहे.
६ दिवस आणि ५ रात्रीचे टूर पॅकेज :
या पॅकेजची सुरुवात भोपाळपासून होणार आहे. ६ दिवस आणि ५ रात्रीचे टूर पॅकेज ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होईल. पॅकेजमध्ये तुम्हाला भोपाळहून विमानाने दिल्लीला आणि नंतर दिल्लीहून काठमांडूला नेण्यात येणार आहे. यानंतर परतीचा प्रवासही दिल्लीमार्गे भोपाळला विमानाने होणार आहे. टूर पॅकेज 08.08.2022 ते 13.08.22 पर्यंत चालविण्यात येईल.
टूर पॅकेज किती आहे :
पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कम्फर्ट क्लासमधील ट्रिपल ऑक्युपन्सीवर दरडोई खर्च ३८,४०० रुपये आहे. डबल ऑक्युपन्सीवर प्रति व्यक्ती ३८,७०० रुपये आहेत. त्याचबरोबर सिंगल ऑक्युपन्सीचा दरडोई खर्च ४६ हजार ९०० रुपये आहे. २ ते ११ वर्षांच्या मुलासाठी बेडसह ३७ हजार ७०० रुपये आणि बेडशिवाय ३२ हजार ६०० रुपये आकारले जातात.
टूर पॅकेजचे ठळक मुद्दे :
* पॅकेजचे नाव : Naturally Nepal Ex Bhopal
* दौरा किती दिवस असेल – 6 दिवस आणि 5 रात्री?
* प्रस्थान दिनांक – ८ ऑगस्ट २०२२
* जेवणाची सोय – नाश्ता आणि रात्रीचं जेवण
* प्रवास माध्यम – उड्डाण (विमान प्रवास)
बुकिंग कसे करावे :
माहितीनुसार, आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com वेबसाइटला भेट देऊन या टूर पॅकेजचे बुकिंग ऑनलाइन करता येणार आहे. आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिसेस आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातूनही बुकिंग करता येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: IRCTC Tour Packages for Nepal check details 16 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं