मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही या राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाची भाजप आमदाराकडून पाठराखण

Governor Bhagat Singh Koshyaris Controversial Statement | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.
भाजकडून समर्थन :
दरम्यान, त्यांचे भाषण हे कापण्यात आले आहे. त्यांच्या भाषणाचा आशय हा राष्ट्रप्रेमाशी निगडीत आहे’असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार पाठराखण केली आहे. मुंबई ही सगळ्यांची आहे, मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये प्रत्येकाचे योगदान आहे. राज्यपालांच्या भाषणाचा आशय आपण हे समजून घेतला पाहिजे, मुंबईत सर्वांचं योगदान आहे, त्या दृष्टीने त्यांचे वक्तव्य आहे. त्या वक्तव्याला आपण राजकीय रंग देण्याची गरज नाही, असं राम कदम म्हणाले.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं टीकास्त्र :
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हीडिओ ट्विट करत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”
केसरकरांनी काय प्रतिक्रिया दिली :
ज्या लोकांनी पैसा कमावला त्यांनी मुंबईत येऊन पैसा कमावला आहे. इथे आलेल्या माणसांचा मराठी माणसाने आनंदाने स्वीकार केला आहे. मराठी माणूस बुद्धिमान असतो. मेडिकल, वकिली, चार्टेड अकाऊंटट या क्षेत्रात मराठी माणूसच टॉपमोस्ट माणूस आहे. पण व्यापारात मराठी माणसाचा कल राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे, असं सांगतानाच राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांनी अशी विधाने करू नये हे केंद्राला कळवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मुख्यमंत्री मुंबईत येतील तेव्हा ते केंद्राशी चर्चा करतील. अशा पद्धतीचे विधाने होऊ नये याची खात्री करतील, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BJP MLA Ram Kadam support governor Bhagat Singh Koshyari controversial statement check details 30 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं