खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात | ९ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं

MP Sanjay Raut | पत्रा चाळ प्रकरणात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता संजय राऊतांच्या घरी पोहोचलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणात आज सकाळी ईडीचं पथक शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. सकाळी ७ वाजेपासून ईडीच्या पथकाकडून संजय राऊतांची चौकशी सुरू होती.
ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच दिशेने आता घडामोडी संजय राऊत यांच्या घरात घडताना दिसत आहे. सकाळी ७ वाजेपासून संजय राऊत यांच्या घरात तळ ठोकून असलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivsena MP Sanjay Raut detained by ED in Patra Chawl land scam case money laundering probe check details 31 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं