PNB घोटाळा; चोक्सीचे नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही : अँटिग्वा सरकार

अँटिग्वा : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आमच्या देशाचे दिलेले नागरिकत्व आम्ही रद्द करू शकत नाही, असे अँटिग्वा सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतातील बहुचर्चित पीएनबी घोटाळ्यातील आरोप मेहुल चोक्सी याला भारतात आणताना केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.
अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीवर सदर विषयावर भाष्य केले. दरम्यान ‘मेहुल चोक्सी हे आता अँटिग्वाचा नागरिक आहेत आणि इथले सरकार त्याची नागरिकता अशा प्रकारे हिसकावून घेऊ शकत नाही.’ दरम्यान, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे, अशा बातम्या शनिवारी प्रसिद्ध होत होत्या, या अफवांच्या अंती अँटिग्वा सरकारने हे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं