भाजपा कट्टरतेवर उतरल्यास लोकसभेपूर्वीच देशात दंगली होतील: अमेरिकन गुप्तचर यंत्रणा

नवी दिल्ली: देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सर्वच पक्षांच्या बाजूने जोरदार सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने एक धक्कादायक अहवाल दिला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास भारतात दंगली उसळण्याची शक्यता या वर्तविण्यात आली आहे आणि हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर जगातील सर्वात मोठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएनं केला आहे.
अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर प्रचंड जोर दिल्यास देशात भयानक सांप्रदायिक दंगली उसळतील, असा खबळजनक दावा या अहवालात करण्यात आला आहे. स्थानिक वृत्तानुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर सदर अहवाल ठेवण्यात आला आहे. जो CIA या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी सविस्तरपणे तयार केला आहे.
रिपोर्टमध्ये नमूद केल्या प्रमाणे, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन पुढे गेल्यास देशात लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीआधीच मोठ्या जातीय दंगली होतील. अमेरिका दर वर्षाच्या सुरुवातीलाच हा अहवाल प्रसिद्ध करते. त्यानंतर देशभरातील घटनांचं आणि घटनाक्रमांचे मूल्यांकन केलेलं असतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं