Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांनी खरेदी केलेला हा स्टॉक रॉकेट सारखा वाढतोय, बाजार तज्ञांचा खरेदी करण्याचा सल्ला

Jhunjhunwala Portfolio | तिमाही आकडेवारी जाहीर केल्यानंतर, बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांनी या शेअर्सवर 330 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. एलारा आणि एडलवाईज सिक्युरिटीजने या स्टॉकवर पुढील काळातील लक्ष किंमत 325 रुपये ठरवली आहे. नोमुरा इंडिया या ब्रोकरेज फर्मने या स्टॉक चे पुढील काळातील पुढील लक्ष्य किंमत 319 रुपये ठरवली आहे.
राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओ स्टॉक :
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला हा जबरदस्त स्टॉक म्हणजे फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड. ह्या स्टॉकच्या जून तिमाहीतील निव्वळ नफ्यात 69 टक्के वार्षिक तोटा नोंदवण्यात आला आहे. तथापि, शेअर बाजारातील विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा तिमाही निकाल बराच चांगला आला आहे. यामुळेच बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदार फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टॉकवर अतिशय उत्साही आणि गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहे. तज्ञ हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीचे शेअर्समध्ये 1.08 टक्के वाढ झाली होती आणि स्टॉक ची किंमत 270.20 रुपये च्या वर व्यवहार करत होती.
पुढील लक्ष्य किंमत :
तिमाही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, बाजारातील तज्ञ गुंतवणूकदार यांनी स्टॉकवर पुढील काळात 330 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. एलारा आणि एडलवाईज सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्म ने या स्टॉकवर 325 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. त्याचवेळी नोमुरा इंडिया या ब्रोकरेज फर्म ने स्टॉक ची लक्ष्य किंमत 319 रुपये दिली आहे. ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकवर 299 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ट्रेंडलाइन ने दिलेल्या माहितीनुसार, स्टॉकचे पुढील काळातील सरासरी किमत लक्ष्य 327 रुपये आहे. जे सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
तज्ञांचे मत काय आहे?
एलारा फर्म चे म्हणणे आहे की, कोरोना मुळे रूग्णांच्या संख्येत झालेली वाढ झाली आणि महामारी मुळे मागील दोन वर्षात हॉस्पिटलच्या व्यवसायाला आणि उद्योगाला चालना मिळाली. नॉन-कोविड व्यवसाय चांगला वाढत आहे. आर्थिक वर्ष 22- 2023 साठी Ebitda अंदाजामध्ये 2 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आणि पुढीलआर्थिक वर्षात अंदाजे 6 टक्के वाढ राहील. या तिमाहीत फोर्टिसचा एकत्रित वार्षिक नफा 69 टक्क्यांनी घसरला आहे. वार्षिक नफा घसरून 134 कोटी रुपयांवर आला आहे. तर कंपनीचा महसूल 5.53 टक्क्यांनी वाढला असून 1488 कोटी रुपयांवर गेला आहे. एबिटा वार्षिक 20.1 टक्क्यांवरून 18.3 टक्क्यांपर्यंत घसरला, आणि 283.10 कोटीं रुपयावरून 271.80 कोटींवर आला आहे.
हा स्टॉक बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 30 जूनपर्यंत या कंपनीचे 31,950,000 शेअर्स होते. त्यांची या कंपनीत 4.23 टक्के गुंतवणूक आहे. 2021 च्या सप्टेंबर तिमाहीपासून झुनझुनवाला यांनी फोर्टिसचे शेअर्स होल्ड केले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार बिग बुल राकेश झुनझुनवाला यांची कंपनीत 850 कोटी रुपयेची गुंतवणूक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Jhunjhunwala Portfolio has Fortis healthcare stock on investment on 12 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं