एसबीआय'च्या लाखो ग्राहकांचा बँक खात्यासह महत्त्वाचा डेटा लीक

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय’च्या ग्राहकांची महत्त्वाची माहिती स्टोअर असणाऱ्या मुख्य सर्व्हरमधील हजारो ग्राहकांची अति महत्त्वाची माहिती लीक झाल्याचे वृत्त आहे. त्यात बँक बॅलेन्स, खाते क्रमांक अशा महत्वाच्या खासगी माहितीचा समावेश आहे. दरम्यान, सर्व्हरमधील डेटा हा कोणत्याही सुरक्षेविना असल्यामुळे हे घडल्याचे वृत्त आहे.
Techcrunch दिलेल्या हे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार बँक सर्व्हरला कोणताही पासवर्ड ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणीही बँकेचा अति महत्त्वाचा डेटा अगदी सहज प्राप्त करु शकतं असं म्हटलं आहे. त्यामुळे, ज्यांना हॅकर्सना सर्व्हरमधून ग्राहकांची खासगी माहिती कशी मिळवली जाते याचे ज्ञान असेल त्यांच्यासाठी ती मिळवणे अगदी सहज आहे. दरम्यान, सर्व्हर किती वेळासाठी कोणत्याही सुरक्षेविना ठेवण्यात आला होता, याची कोणतीही माहिती मिळू प्राप्त होऊ शकलेली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं