Inflation Effect | वाढत्या महागाईने या देशातील अनेक महिलांवर देहव्यापाराची वेळ, घरातील कुत्रा-मांजरांना खाणं देणं अशक्य

Inflation Effect | ब्रिटनमधील वाढत्या महागाईमुळे अनेक महिलांना देहव्यापाराला भाग पाडले जात आहे. वेश्याव्यवसायातून पैसे मिळावे यासाठी घरांमधून बाहेर पडून थेट रस्त्यावर अनेक महिला जाणं पसंत करत आहेत. इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टिट्यूट नावाच्या संस्थेच्या अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिलांना या व्यवसायातून बाहेर काढण्याचे काम ही संस्था करते.
‘यंदाच्या उन्हाळ्यात आमच्या हेल्पलाइनवरील प्रश्नांची संख्या सुमारे ३३ टक्क्यांनी वाढली आहे. या कामात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या आधीच काही ‘धोकादायक’ ग्राहकांना स्वत:पासून दूर करू शकत नाहीत. दरम्यान, आता त्यांना रस्त्यावर ग्राहकांना भेटण्यास भाग पाडले जात आहे. या संस्थेच्या प्रवक्त्या निकी अॅडम्स यांनी सांगितले की, “महागडे अन्न आणि वीज बिलांमुळे महिलांना या कामात सामील व्हावे लागले आहे. वाढत्या खर्चामुळे स्त्रिया हतबल झाल्या आहेत, ज्यांच्यावर आपल्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आहे. तिला हेही माहीत आहे की, या कामात सहभागी होऊन ती हिंसा आणि शोषणापासून स्वत:चा बचाव करू शकत नाही.
अलीकडे आठवड्यातून एकदा तरी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका स्त्रीने म्हटले: “मी आठवड्यातून किमान एका ग्राहकाची सेवा करते. या बदल्यात मला मिळणाऱ्या पैशातून मी घरभाडे, वीज किंवा गॅस बिल भरते.
ब्रिटनमध्ये महागाई इतकी वाढली आहे की, लोकांना आपल्या पाळीव प्राण्यांना खायलाही घालता येत नाही. यासाठी श्वान आणि मांजरांचे मालक प्राण्यांशी संबंधित घटकांकडे वळले आहेत. आरएसपीसीए या अशाच संस्थांनी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये १९,५०० कुत्रे आणि मांजरींना अन्न पुरवले होते, जे जानेवारीत ९,००० होते. वेल्समध्ये, पाळीव प्राण्यांच्या फूडबँकेने यावर्षी 46,000 प्राण्यांसाठी अन्न वाटप केले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 25 पेक्षा जास्त आहे.
चलनवाढीचा दर १० च्या पुढे :
अन्नधान्य आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे जुलैमध्ये ब्रिटनमधील महागाई ४० वर्षांच्या नव्या उच्चांकी पातळीवर १०.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जीवनावश्यक अन्नपदार्थांचा वार्षिक चलनवाढीचा दर आता १२.७ टक्क्यांवर स्थिरावला असून, जूनमध्ये तो ९.८ टक्के होता. ही वाढ प्रामुख्याने अन्नधान्य आणि ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे नोंदवण्यात आली आहे. अन्नधान्याचे वाढते दर आणि वीज-गॅसची बिले यामुळे त्रस्त होऊन त्यांना घराबाहेर पडून रस्त्यावर ग्राहकांना भेटणे भाग पडते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Inflation Effect in Great Britain check details 22 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं