पोस्टमन कर्मचारी सुद्धा अडचणी घेऊन कृष्णकुंज'वर, सत्तेत भाजप-शिवसेना की मनसे?

मुंबई : भारतीय टपाल विभागाचे कर्मचारी म्हणजे सर्वांना माहित असलेले पोस्टमन कर्मचारी उद्या कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध अडचणी त्यांच्या समोर मांडणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय पोस्ट खात्यातील GPO मध्ये काम करणा-या अनेक पोस्टमन कर्मचा-यांची वेतनवाढ झालेली नाही. त्यात इतर राज्यात त्याच कामासाठी किमान भत्ता ५९३ रूपये असताना आम्हाला त्यापेक्षा कमी भत्ता का? असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आजच्या तंत्रज्ञान आधारित जीवनशैलीत सुद्धा सायकलवरून आणि पायपीट करत घराघरात चिठ्ठी पोहचवण्याचे काम हे पोस्टमन काका करताना दिसतात. जग प्रगत होत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमनची अवस्था मात्र खडतर होताना दिसत आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त बाहेरील राज्यांमध्ये दिवसाला किमान भत्ता ५९३ रूपये आहे. परंतु, इथल्या कर्मचाऱ्यांना २८८ रूपये दिवसाला मिळतात. दरम्यान, किमान भत्तासाठीचा जीआरही निघाला आहे. त्यामुळे हे वेतन वाढवावे, नवीन गणवेश मिळावेत आदी मागण्यांसाठी साधारण १ हजारहून अधीक पोस्ट कर्मचारी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मेस्त्री म्हणाले.
अशी सर्व परिस्थिती असताना एक विषय विचार करायला लावणारा आहे आणि तो म्हणजे केंद्रात आणि राज्यात सत्ता भाजप आणि शिवसेनेची, परंतु मागण्या घेऊन सरकारी कर्मचारी मातोश्री किंवा वर्षा निवासकडे जाताना दिसत नाहीत. याचाच अर्थ ते कुचकामी आहेत, असं कर्मचाऱ्यांनाच वाटत असावं का ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं