मनसे आयोजित ५०० गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा उत्साहात

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जिल्ह्यातील ५०० गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या विवाह सोहळ्याला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मनसेने पालघर जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीआधी राज ठाकरे यांची जंगी सभा आयोजित केली होती.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील तब्बल ५०० जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा पक्षाच्या खर्चातून आयोजित करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा सामुदायिक विवाहसोहळा उत्साहाने पार पडत आहे. ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यासाठी मागील महिन्याभरापासून प्रचंड मेहनत घेतली होती.
अविनाश जाधव यांच्या नैतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पालघर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार विस्तार सुरु असून, अनेक सामाजिक उपक्रमातून मनसे घराघरात पोहोचवण्याचा जोरदार प्रयत्न मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने सुरु आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं