विधानसभेच अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार: अशोक चव्हाण

औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
त्यामुळे काही करून मतांचे विभाजन टाळा आणि भारतीय जनता पक्ष – शिवसेनेला पाडा,’ असे थेट आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी काँग्रेस आयोजित जाहीर सभेत ते संवाद साधत होते. दरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीला मदत होईल, असे काही तुम्ही करू नका. त्यात केवळ तीस टक्के मतांवर भाजपचे सरकार देशात आलेले. त्यामुळे उर्वरित ७० टक्के मते आता काही करून एकत्र राहिली पाहिजेत.
दरम्यान प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकवेळा नव्हे, तर तब्बल ५ वेळा गेलो. कारण जागावाटप म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनून लोकसभेत जावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. तसेच देशात काँग्रेस RSSच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील असे स्पष्ट केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं